रणजीसह इतर विविध वयोगटांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संभाव्य क्रिकेट संघात नाशिकच्या आठ खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामध्ये साजिन सुरेशनाथला पुन्हा एकदा रणजीसाठी संघात स्थान मिळाले आहे.
मागील वर्षी १९ वर्षांआतील विनू मंकड चषक स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना देशात सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छावचा समावेश आता २५ वर्षांआतील सी. के. नायडू स्पर्धेसाठीच्या संघात करण्यात आला आहे. मोहित कपूरलाही या संघात स्थान देण्यात आले आहे. याआधीही विनू मंकड चषकासाठी खेळणाऱ्या यासीर शेख व मुर्तझा ट्रंकवाला यांसह आशिष वाघमारे, दर्शन सोनवणे, अभिषेक राऊत यांचीही यंदाच्या हंगामासाठी संभाव्य संघात वर्णी लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने मुंबई येथे फिरकी गोलंदाजांसाठी आयोजित शिबिरात नाशिकचा डावखुरा गोलंदाज दर्शन सोनवणेची निवड करण्यात आली होती. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight players of nashik in maharashtra probable cricket team