‘जहर’मधल्या बोल्ड सीन्समुळे गाजलेली उदिता गोस्वामी आता ‘लग्नाच्या बेडी’त अडकली आहे. आठ वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर अभिनेता मोहित सुरी आणि उदिता यांनी आपली ‘प्रेमाची गोष्ट’ यशस्वी करीत गुरुद्वारामध्ये लग्न केले. आता गुरुवारी त्यांच्या लग्नाचा स्वागत सोहळा महालक्ष्मी रेसकॉर्सवर होत आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत अमक्या अभिनेत्रीचे तमक्या अभिनेत्याबरोबर ‘प्रकरण’ आहे, अशा घटना वारंवार घडतात. मात्र त्या ‘प्रकरणा’तून काहीतरी घडले आहे, असे क्वचितच होते. उदिता आणि मोहित यांनी मात्र आठ वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांचे लग्न अगदी पारंपरिक पंजाबी पद्धतीने झाले. उदिताने मस्त गुलाबी लेहंगा आणि खमिस असा पेहराव केला होता. तर मोहितने पांढरी शेरवानी आणि त्यावर काळे जॅकेट असा पोशाख केला होता.
या दोघांच्या लग्नासाठी उदिताचे काका महेश भट्ट आणि मुकेश भट्ट व सिमले सुरी हजर होते; तर हिंदी चित्रपटसृष्टीतील दिया मिर्झा, कंगना राणावत, जॅकलिन फर्नाडिस, श्रद्धा कपूर, अनुराग बसू आदी उपस्थित होते.

Story img Loader