एकता कपूरची अंकज्योतिषावर गाढ श्रध्दा आहे. त्याचा परिणाम तिच्या अनेक शोच्या शीर्षकांमध्ये आणि त्याच्या उच्चारांमध्ये झाला आहे. हीच श्रध्दा आता चित्रपटातली कारकीर्द वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या तिच्या भावाला तुषारलाही जडली आहे.  
तुषार आता कृषिका लुल्ला दिग्दर्शित ‘बजाते रहो’ चित्रपटात काम करतो आहे. या चित्रपटाला चांगले यश मिळावे, यासाठी  तुषारने आपल्या चित्रपटाचे शीर्षक बदलण्यास दिग्दर्शकाला भाग पाडले आहे.  अंकज्योतिषशास्त्रानुसार शीर्षक फलदायी असायला हवे, असा तुषारचा आग्रह होता. ज्योतिषांनी सांगितल्यानंतर या चित्रपटाचे शीर्षक   ‘बजाते रहो’ च्या इंग्रजी शब्दांमध्ये बीनंतर एच टाकण्यात आला. त्यामुळे  त्याचा उच्चार हिंदीत करायचा झाल्यास तो ‘भजाते रहो..’ असा होतो.मात्र,   उच्चारताना तो बजाते रहो असाच करावा, असा मधला तोडगा तुषारने सुचवला आहे.

Story img Loader