लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात ज्या काही लढतींनी सर्वाचे लक्ष वेधले आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचा समावेश असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत असल्याने हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा विषय झाला असून त्यांच्या विजयासाठी याआधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह संयुक्त मेळावा घेणारे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा नाशिकचा दौरा करणार असून मतदारसंघात दोन-तीन दिवस तळ ठोकणार आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हेही सभा घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून प्रचाराची ही तऱ्हा अवलंबिण्यात येत असताना महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याकडून नात्यागोत्यांवर विशेष भर देण्यात येत आहे. संपूर्ण मतदारसंघात पसरलेले नात्यागोत्यांचे जाळे ही गोडसे यांची मुख्य शक्ती मानली जात असून ग्रामीण भागात त्याचा प्रत्यय प्रतिस्पर्धी उमेदवारांना येऊ लागला आहे. नात्यागोत्यांचे हेच जाळे नाशिक शहरात मनसेचे उमेदवार डॉ. प्रदिप पवार यांच्यासाठी काम करताना दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा