अकोला भाजप जिल्हा अध्यक्षपदावर तेजराव थोरात, तर शहर अध्यक्षपदी डॉ.अशोक ओळंबे यांची फेरनिवड झाली. या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून प्रा.रवींद्र खांडेकर व मोहन शर्मा यांनी कामकाज पाहिले. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या नावाची चर्चा होती. कुठलीही निवडणूक न होता त्यांची अविरोध विजयाची घोषणा केली गेली.
गेल्या अनेक दिवसांपासून लांबलेली भाजप शहर व जिल्हा अध्यक्षपदाची निवड पक्षाने केली. राज्य परिषदेवर माजी नगरसेवक विलास शेळके, दादाराव ताथोड, विजय जवंजाळ, गोविंदराव लांडे, संजय काळदाते यांची निवड झाली, तसेच यावेळी पूर्व मंडळ अध्यक्षपदी धनंजय गिरीधर यांची निवड जाहीर करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी रमण जैन, संदीप उगले, राजा राजनकर, दिगंबर गावंडे, रमेश लोहकरे, योगेश नाठे, गजानन गावंडे, विलास पोटे, अभय पांडे, ओमप्रकाश मंत्री यांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला आघाडी सचिव भारती गावंडे यांनी भाजपत प्रवेश घेतला. मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार डॉ.रणजित पाटील, आमदार हरिश पिंपळे, हरिश आलिमचंदानी, डॉ.रामदार आंबटकर, किशोर काळकर यांची उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा