जिल्ह्य़ात २४ ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने जारी केली आहे. अर्ज भरण्यास ३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ही निवडणूक २२ डिसेंबरला होणार आहे. जिल्ह्य़ातील १३ तालुक्यातील ३७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर १३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका पार पडल्या. यामध्ये काटोल तालुक्यातील ५३, नरखेड तालुका २९, सावनेर तालुका २६, कळमेश्वर तालुका २२, रामटेक तालुका २८, पारशिवनी तालुका १७, मौदा तालुका ३०, उमरेड तालुका २६, भिवापूर तालुका ३७, कुही तालुका २५, नागपूर ग्रामीणमधील २७, कामठी तालुका ११, हिंगणा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या ग्रामपंचायतीतील सरपंचांच्या निवडणुका अजूनपर्यंत व्हावयाच्या असताना राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी ते मार्च २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुका घेण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कन्हान ग्रामपंचायत वगळता एकूण २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २२ डिसेंबरला घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
नरखेड तालुक्यातील सावरगाव येणीकेणी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक होत असून सिंदी, मसोरा, जामगाव बु., वडविहिरा, आरंभी, पिंपळगाव खैरगाव, महेंद्री येथे पोटनिवडणूक सावनेर तालुक्यातील खर्डुका येथे सार्वत्रिक निवडणूक पारशिवनी तालुक्यातील धवलापूर, बिटोली, येथे सार्वत्रिक  निवडणूक नागपूर ग्रामीण तालुक्यातील पिपळा दहेली, रुई, शिवा, बोरी, दुधा, खरसोली, रामा, शिरपूर, रुईखैरी, गोधनी, येथे सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
या निवडणुकीसाठी ३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ७ डिसेंबर आहे. ९ डिसेंबरला अर्जाची छाननी होणार आहे.
अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिनांक ११ डिसेंबर आहे. ११ डिसेंबरला निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा