गोंदिया तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून जुन्या इमारतीच्या मातीसह जुन्या कागदपत्रांच्या ढिगारा हलविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात आज, ५ जानेवारीला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास गोंदियातील नागरिकांची मतदान ओळखपत्रे व मतदारयाद्या कचऱ्याच्या ढिगारात आढळून संजयनगर कव्वाली मदान परिसरातील नागरिकांना दिसून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
देशांतर्गत झालेल्या लोकसभा निवडणुका व राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागरिकांना त्यांचे नाव मतदारयादीत नसल्यामुळे वा त्यांच्याजवळ मतदान ओळखपत्रे नसल्यामुळे मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागले असल्याचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते. यात पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी तर काही नामवंत चित्रपट कलावंत, आंतरराष्ट्रीय खेळाडू, काही नामवंत साहित्यिकांपासून तर मोठ मोठय़ा प्रतिष्ठित नागरिकांचे नाव मतदारयाद्यांतून गायब असल्यामुळे त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची नामुष्की ओढावली होती. अशीच परिस्थिती गोंदिया तालुक्यातील बऱ्याच मतदान केंद्रांवर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आली होती. येथेही बऱ्याच नागरिकांना मतदानाच्या अधिकारांपासून वंचित राहावे लागले होते. मतदारयाद्यात नाव समाविष्टपासून तर मतदान ओळखपत्र वाटप करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या आपल्या कामात कुचराई करण्यामुळे की काय हे मतदान ओळखपत्र व मतदारयाद्यांच्या वाटपात दिरंगाई करण्यात येत असल्यामुळे असे घोळ होतात. यावर गोंदियातील तहसील कार्यालयातील कचऱ्यात दिसून येत असल्याने या ओळखपत्र वाटपात शासकीय अधिकारीच किती आळस दाखवितात,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
ढगाऱ्याचे निरीक्षण केले केराच्या ढिगारात आढळलेले मतदान ओळखपत्रे वाटप न करणाऱ्या गोंदिया तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारपासून तर लिपिकापर्यंतची ओळखपत्र वाटपाची जवाबदारी असतानाही त्यांनी ते केले नाही. त्यांच्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी कारवाई करणार की त्यांनी केलेल्या चुकीकडे दुर्लक्ष करीत त्यांना वाचविणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकाराची माहिती उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांना कळविण्यात आल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट दिली व घडलेला प्रकार फारच गंभीर असल्याचे नमूद करून या प्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येईल व यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘लोकसत्ता’ शी बोलतांना सांगितले.
गोंदियात मतदारयाद्या व मतदान ओळखपत्रे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात!
गोंदिया तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून जुन्या इमारतीच्या मातीसह जुन्या कागदपत्रांच्या ढिगारा हलविण्याचे
First published on: 06-01-2015 at 07:27 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electoral rolls and voting paper at dustbin in gondiya