कल्याणातील सुशिक्षितांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्णिक रोड परिसरात येत्या रविवारी होणाऱ्या महापालिकेच्या पोटनिवडणूकीत काँग्रेस आणि शिवसेनेत जोरदार लढत होण्याची चिन्हे असून वरवर पाहाता ही साधी पोटनिवडणूक वाटत असली, तरी शिवसेनेचे जिल्हासंपर्क नेते एकनाथ िशदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.
महापालिकेतील माजी सभागृह नेते तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळकर यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने ही निवडणूक होत असली, तरी देवळकर यांच्यासाठीही ही निवडणूक अटीतटीची ठरणार आहे. देवळकर यांच्या प्रभागातून शिवसेनेने िरगणात उतरवलेले प्रभुनाथ भोईर यांचा पाडाव झाल्यास शिवसेनेसाठी या भागातून आगामी विधानसभेचे गणितही कठीण होउन बसेल आणि देवळेकरांचा विधानसभेचा मार्गही धोक्यात येउ शकेल, असे या भागातील एकंदर राजकीय चित्र आहे. त्यामुळे देवळेकरांसाठी शिवसेना नेत्यांची ठाण्यातील फौजही या प्रभागात प्रचारासाठी उतरली असून आमदार िशदे यांच्यासह नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे असे पक्षाचे बडे नेते पोटनिवडणुकीसाठी कामाला लागले आहेत.
महापालिकेतील सभागृह नेते आणि एकनाथ िशदे यांचे कट्टर समर्थक देवळेकर यांचे नगरसेवकपद जातीच्या कारणामुळे उच्च न्यायालयाने रद्द केल्याने १४ आक्टोबरला कर्णिक रोड प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. काहीही झाले तरी देवळेकर यांना स्वीकृत म्हणून पुन्हा महापालिकेत घ्यायचे असे गणित मांडत शिवसेनेने विद्यमान स्वीकृत नगरसेवक प्रभुनाथ भोईर यांना या प्रभागातून िरगणात उतरवले आहे. भोईर यांचा या प्रभागाशी तसा संबंध नाही. मात्र, देवळेकर यांच्या कामाच्या जोरावर त्यांनी मतांचा जोगवा मागण्यास सुरुवात केली असून देवळेकर यांना धक्का देण्याची हीच वेळ आहे हे लक्षात आल्याने काँग्रेसनेही या प्रभागात जोर लावला आहे. भोईर यांचा विजय झाला की देवळेकर यांचा स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत जाण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.
या प्रभागातून काँग्रेसच्या चैत्राली बोराडे, मनसेच्या रेखा भोईर िरगणात आहेत. या प्रभागात तिरंगी लढत होत आहे. बोराडेंच्या समर्थक काँग्रेसच्या माजी नगरसेविका स्टेला मोराईस, जिम्मी मोराईस यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. ऑक्टोबर २०१० च्या निवडणूकीत या प्रभागात देवळेकर यांनी बोराडे यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे यंदाही या प्रभागात वरचष्मा दाखविण्यासाठी देवळेकर यांनी तयारी केली आहे.
’ दरवाढीचा प्रस्ताव
महापालिकेने इंधनावरील जकात दरात कपात केल्याने सुमारे १५ कोटी १७ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळेल. मात्र, या वर्षांच्या उर्वरित कालावधीत दरमहा १ कोटी २६ लाख रुपये इतका कमी महसूल मिळेल. त्यामुळे जकात करापोटी उर्वरित आर्थिक वर्षांत ७ कोटी ७० लाख रुपये तूट अपेक्षित करण्यात आली आहे. तसेच ही तूट भरून काढण्यासाठी मार्गस्थ दाखला फि च्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास दरमहा ४ कोटी ७५ लाख वाढीव उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे, असेही आयुक्त राजीव यांनी सांगितले. तसेच जाहीरात, पे अ‍ॅण्ड पार्कमधून आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यात येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. तसेच जाहीरात, पे अ‍ॅण्ड पार्कमधून आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यात येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा