मुलींच्या वसतिगृहासाठी मिळविलेल्या अनुदानाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तब्बल २१जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबाद कॉलेज फॉर वुमेन्स, नवखंडा, ज्युबिली पार्कशी हे सर्व आरोपी संबंधित आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) तब्बल ३७ लाख १९ लाख ७१९ रुपये अनुदान मिळवून अपहार केल्याची फिर्याद आहे. बेगमपुरा पोलिसांनी डॉ. फातेमा रफीक झकेरिया (वय ७८), इस्मतउल्ला पाशा (वय ५०) व अन्य १९ अशा २१जणांविरुद्ध गुन्हय़ाची नोंद केली. सय्यद मुजफरोद्दीन अब्दुल कलमी (वय ६४, सेन्ट्रल नाका, जसवंतपुरा, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली. उपरोल्लेखित संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहासाठी आरोपींनी संगनमत करून ११ वर्षांपूर्वी (२००२) विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) या रकमेचे अनुदान मिळविले. परंतु यातून वसतिगृहाचे बांधकाम केले नाही. या रकमेचा अपहार केला. वसतिगृह व बांधकामाची बनावट कागदपत्रे व खोटा दस्तावेज सादर करून तो खरा असल्याचे भासवून सरकारची फसवणूक केली. या फिर्यादीनुसार बेगमपुरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. दरम्यान, या प्रकारामुळे शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली. सरकारी संस्थांकडून अनुदानाची रक्कम उकळून त्याचा प्रत्यक्ष उपयोग न करता इतरत्र ते वापरण्याचा प्रकार इतरही काही संस्था करतात काय, याचा शोध घेण्याची गरज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
यूजीसीच्या अनुदानाचा अपहार; संस्थेच्या २१जणांविरुद्ध गुन्हा
मुलींच्या वसतिगृहासाठी मिळविलेल्या अनुदानाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तब्बल २१जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबाद कॉलेज फॉर वुमेन्स, नवखंडा, ज्युबिली पार्कशी हे सर्व आरोपी संबंधित आहेत.
First published on: 11-12-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Embezzle of ugc grand crime on 21 of organization