महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यातील औद्योगिक आणि व्यवसायिक क्षेत्रातील कामगारांना देण्यात येणारे कामगार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यावर्षीचा कामगारभूषण पुरस्कार नाशिकच्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीमधील कामगार नरेंद्र कलंकार यांना जाहीर करण्यात आला आहे.
याशिवाय राज्यातील कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील ९० कामगारांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. त्यात विदर्भातील विविध कार्यालयातील १४ कामगारांचा समावेश आहे.
कामगारांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दरवर्षी कामगार कल्याण मंडळातर्फे कामगारांचा सन्मान केला जातो. विदर्भातून राजू अमरसिंग चव्हाण (शासकीय मुद्राणालय व ग्रंथागार,नागपूर), सुरेश आत्माराम तुम्मे (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण, चंद्रपूर), भारत रामचंद्र इंगोले (रेलपोल प्लास्टिक प्रॉडक्टस, अकोला), सुधीर विनायक प्रधान (म.रा. बियाणे महामंडळ महाबीज, अकोला), रवी दिवाकरराव गिऱ्हे (बँक ऑफ इंडिया नागपूर), रमेश पुंडलिकराव वैराळे (महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती, कोराडी), नाटय़ कलावंत अभय अंजीकर (महाराष्ट्र राज्य वीज मंडळ नागपूर), जगदीश पाटमासे (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नागपूर), अरुण वासुदेव डांगरे (नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), सुभाष श्रीराम गवई (महावितरण बुलढाणा), नरेंद्र रठाटे ( औष्ण्कि विद्युत केंद्र, चंद्रपूर), लक्ष्मण जाधव (गांधीबाग सहकारी बँक नागपूर) आणि राजेंद्र सीताराम वाघ (महाबीज अकोला) यांना गुणवंत कामगार भूषण जाहीर करण्यात आले आहे. यावर्षीचा ३० वा गुणवंत कामगार पुरस्कार समारंभ भारतीय कामगार चळवळीचे जनक रावसाहेब दिव. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीदिनी ९ फेब्रुवारीला मुंबईला आयोजित करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा