शेतक ऱ्यांना वैयक्तिक कर्ज देण्यास यावे, या मागणीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने मंगळवारी निवासी जिल्हाधिकारी संजय पवार व अग्रणी बँकेचे अधिकारी के.एच.प्रसाद यांना घेराओ घालण्यात आला. या वेळी पवार या संदर्भातील उचित कारवाई सत्वर करून शेतक ऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.    
शासनाच्या वतीने शेतक ऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. हे काम राष्ट्रीयीकृत बँकांच्या वतीने करण्यात येते. तथापि बँका शेतक ऱ्यांना कर्ज देताना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खूप वेळ घालवितात. वेगवेगळी कागदपत्रे गोळा करताना शेतकरी हैराण होतो. कर्ज देताना तारणाचा बोजा चढविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यामुळे शेतक ऱ्यांना वैयक्तिक कर्ज द्यावे, अशी जनसुराज्य शक्ती पक्षाची मागणी आहे. या संदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदने दिली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती.    
या पाश्र्वभूमीवर मंगळवारी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, अनिल कवाळे, तानाजी मोरे व दत्ता चौगुले यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे निवासी जिल्हाधिकारी पवार व अग्रणी बँकेचे अधिकारी प्रसाद यांच्याशी चर्चा केली. या वेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी या संदर्भातील कारवाईचे आश्वासन दिले.