राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप येत्या १७ जानेवारी रोजी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यामध्ये वाहतुकीच्या विषयावर चर्चा होणार आहे, अशी माहिती महामार्ग पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी मंगळवारी दिली.
महामार्ग, शहर व ग्रामीण पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. त्यामध्ये पोलिसांकडून रस्ता सुरक्षा संदर्भात विविध जागृती कार्यक्रम राबविले गेले आहेत. या अभियानाचा समारोप येत्या १७ जानेवारी रोजी सकाळी शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे होणार आहे. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर, परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, महापौर वैशाली बनकर आणि मोहिनी लांडे, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विजय कांबळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात गेल्या वर्षी नळदुर्गजवळ झालेल्या अपघातामध्ये मदत करणाऱ्या पाच व्यक्तींचा सत्कार केला जाणार आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

Story img Loader