दिवाळी तोंडावर आली असतांनाच जिल्ह्य़ातील १७ कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक क्षणोक्षणी वेतनाच्या प्रतिक्षेत तिष्ठत आहेत.
वर्धा जिल्हा योजनेअंतर्गत येणाऱ्या १७ कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचा हा प्रश्न आहे. त्यांना सप्टेंबर-ऑक्टोबर अशा दोन महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यासंदर्भात निधीची तरतूद पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयाने न केल्यानेच वेतन लांबल्याचे या शिक्षकांना कळले. अशा वर्गाचे नेतृत्व करणाऱ्या विज्युक्टा संघटनेने याबाबत गेल्या काही दिवसांत पाठपुरावा केला. जिल्हा सचिव प्रा.एकनाथ येसनकर म्हणाले की, निधीची तरतूद न झाल्यानेच वेतन लांबल्याची बाब शिक्षण संचालकांनी मान्य केली. त्यामुळे त्याविषयी पाठपुरावा करण्यात आला. संघटनेने वेतनपथक अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी यासंदर्भात पुणे येथील कार्यालयास ई-मेलने केल्याचे सांगितले, अशी माहिती येसनकर यांनी दिली.
विजुक्टाचे महासचिव प्रा. अशोक गव्हाणकर यांनी नागपुरात वेतन अधीक्षकांशी चर्चा केल्यावर लवकर वेतन काढण्याची हमी दिली, पण अद्याप वेतन झालेले नाही. जिल्हाध्यक्ष प्रा. नेतराम ढोबाळे, प्रा.भास्कर कोहळे, प्रा.गुजर आणि विजुक्टा पदाधिकारी वेतनाचे आदेश काढण्याच्या खटपटीत असल्याचे दिसून आले. दिवाळीला वेतन होण्याची खात्री पदाधिकारी देत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा