श्रीदेवीची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘इंग्लिश विंग्लिश’ हा आता जपान, तैवान आणि साऊथ कोरियामध्ये झळकण्यास सज्ज झाला आहे.
सर्वात आधी हा चित्रपट हाँगकाँग येथे झळकला. त्यानंतर जर्मनीमध्ये या चित्रपटाने वाहवा मिळवली. आता हा चित्रपट लवकरच जगभराची वारी करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदे हिचा हा सर्वात पहिला चित्रपट. पहिल्या चित्रपटाला अनपेक्षितरीत्या मिळालेल्या या यशाने गौरी खूपच आनंदी आहे. या चित्रपटासंदर्भात अधिक बोलताना ती म्हणते, ‘या चित्रपटाने मला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली आहे. भारतासह परदेशातही माझ्या नावाला ओळख मिळालेली आहे. त्यामुळेच माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढलेली आहे.’ ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट श्रीदेवीसाठी सेकंड इनिंग म्हणूनही सर्वोत्तम चित्रपट ठरलेला आहे. यामध्ये श्रीदेवीने एका गृहिणीची भूमिका वठवली असून, तिची शशी गोडबोले ही व्यक्तिरेखा सर्वानाच आपलीशी वाटली आहे हेच या चित्रपटाच्या यशाचे रहस्य आहे.  

Story img Loader