एन्सारा मेट्रोपार्क परिसरात होळीच्या पर्वावर मोठय़ा उत्साहात रंगोत्सव नुकताच आयोजित करण्यात आला. शहरात प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले. आनंद आणि रंगांची उधळून करून साजरा झालेल्या या बहुप्रतीक्षित उत्सवासाठी शहरातील मान्यवर उपस्थित होते.
लक्झोरा इन्फ्रास्टक्चर प्रा.लि. आणि अनया रिअल इस्टेट प्रा.लि. यांनी संयुक्तपणे रोटरी क्लब ऑफ नागपूरच्या सहकार्याने रंगोत्सवाचे आयोजन केले होते. अभिनेत्री तनुश्री दत्ता व अभिनेता विशाल मल्होत्रा या उत्सवात सहभागी झाले. ‘पाणी बचाओ देश बचाओ’ असा संदेश देऊन अ‍ॅक्टर्स असोसिएशन आणि शहरातील संस्थांनी पाणी वाचविण्यासाठी निर्णय घेतला. हे लक्षात घेऊन होळी उत्सव विविध रंगांच्या फुलांनी साजरा करण्यात आला. २१ व्या शतकातील सामूदायिक जीवनाचा एक उत्कृष्ट नमूना ठरावा अशा नव्या ठिकाणाची नागपूरची गरज एन्सारा मेट्रोपार्क पूर्ण करेल, असा विश्वास तनुश्री दत्ताने व्यक्त केला. एन्साला मेट्रोपार्कमधील रंग उत्सव यशस्वी झाला असून नागपुरातून आलेले लोक यामध्ये सहभागी झाले आणि २०१४ साठी नवी सुरुवात होत असल्याचे प्रकर्षांने लक्षात आले, असे अनया रिअल इस्टेट प्रा.लि.चे सहसंस्थापक व संचालक दीपक वसानंदानी यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ नागपूरच्या सहकार्याने साजरा झालेला रंग उत्सव अशा खास निमित्ताच गरज होती. हा रंग उत्सव नागपूरसाठी होळीची एक मेजवानी ठरला, असे आता आम्ही विश्वासाने म्हणू शकतो, असे लक्झोरा इन्फ्रास्टक्चर प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोठारी म्हणाले.
एन्सारा मेट्रोपार्क ३०० एकर परिसरात उभारले जात आहे. पारंपरिक निवासी टाऊनशिप संकल्पनेत सुधारणा करून शहरातील उत्कृष्ट ठिकाणी मेट्रोपार्क विकसित केले आहे.  एन्सारा मेट्रोपार्कमध्ये मोठय़ा हिरव्या मोकळ्या जागा आणि अन्य सुविधा आहेत, असे संजय कोठारी यांनी सांगितले.

Story img Loader