लक्झोरा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (एलआयपीएल)ने एन्सारा मेट्रोपार्क या महाराष्ट्रातील आगळ्यावेगळ्या मेट्रोपार्क प्रकल्पाचे राज्य सरकारच्या विशेष टाऊनशीप धोरणांतर्गत अनावरण करण्यात आले.
वर्धा मार्गावरील मुख्य विकास केंद्राच्या जवळ असलेल्या एन्सारा मेट्रोपार्क हा प्रकल्प २८० एकरात पसरलेला असून तो टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येईल. हा संपूर्ण प्रकल्प एक सर्वागीण, व्हायब्रंट, मिश्र स्वरूपाचा प्रकल्प असून त्यात तलाव, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, क्लब हाऊस, शॉपिंग मॉल, रेस्टेॉरंट आणि एक उत्तम क्रीडा संकुल तसेच इतर सुविधा आणि साधने यांचा समावेश असेल. एन्सारासारखे स्थान उभारण्यासाठी एक उत्तम स्थान म्हणून नागपूरची निवड केली असल्याचे एलआयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोठारी यांनी सांगितले. नागपूरसाठी एन्साराची योजना पुरस्कार विजेत्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भागीदारांकडून केली गेली असून ते शहरातील रहिवाशांच्या वाढत्या इच्छा पूर्ण करणारी आहेत, असे एलआयपीएलचे संचालक चैतन्य पारेख म्हणाले. आन्या आणि लक्झोरा समूहाने संयुक्तरित्या प्रवर्तन केलेला हा प्रकल्प असून एक उत्तम डिझाईन, उच्च दर्जा, सुंदर रचना व आंतरराष्ट्रीय दर्जा याच्यावर भर देऊन आलिशान निवासी घरे बांधण्याचा समूहाचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. एन्सारा मेट्रोपार्कमध्ये ग्राहकांना विविध प्रकारचे निवास देण्यात येत आहेत. त्यात १ बीएचके ते ४ बीएचके आलिशान अपार्टमेंट्स, निवडक रो हाऊसेस आणि काही खास बंगलेही आहेत. अद्ययावतसुविधांनी परिपूर्ण असलेल्या या मेट्रोपार्कमध्ये प्रार्थना व पूजेसाठी ठिकाण, इनडोअर स्पोर्ट कॉम्लेक्स, शाळा, शॉपिंग, क्लब हाऊस, रेस्टॉरंट, बसस्थानक, फायर स्टेशन, पोलीस चौकी, रुग्णालय, बिझनेस पार्क, शॉपिंग मॉल्स, हॉटेल आणि एक प्रशिक्षण संस्थाही राहणार आहे. एन्सारा मेट्रोपार्क हा मध्य भारतातील सर्वात मोठय़ा एफडीआयचे पाठबळ मिळालेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांपैकी एक आहे. आन्या आणि लक्झोरा हे महाराष्ट्रातील इतर प्रकल्पांसाठीही एकत्र आले असून त्यात ठाणे आणि मुंबई महानगर प्रधिकरणाच्या अखत्यारितील विभाग आहेत.

Story img Loader