भारतीय जनता पक्षाने चार राज्यांत मिळवलेल्या घवघवीत यशाने आनंदित झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला. शहरातून दुचाकी रॅलीही काढण्यात आली. नितीश देशपांडे, उत्तम धर्मे, कृष्णात यादव, उदय पवार, शहाजी पाटील, आनंदराव जगताप, रवींद्र पाटील, अरुण वाघमारे, सुनील पवार, अनिल शिंगाडे, अर्जुन निकम, सचिन निकम, जगदीश पाटील, मनोज हबाले, रमजान मुल्ला यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व नागरिक आनंदोत्सवात सहभागी झाले होते. येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. त्यानंतर नागरिकांना पेढे वाटून आता लोकसभेची सत्ता द्या असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांनी केले.
भाजप कार्यकर्त्यांचा कराडमध्ये आनंदोत्सव
भारतीय जनता पक्षाने चार राज्यांत मिळवलेल्या घवघवीत यशाने आनंदित झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला.

First published on: 10-12-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enthusiasm in bjp activists in karad