भारतीय वायुसेनेच्या युनिफाईड सिलेक्शन सिस्टम अंतर्गत सामान्य प्रवेश परीक्षा चाचणी (एएफसीएटी) घेण्यात येते. याद्वारे योग्य उमेदवारास एकाच अर्जाद्वारे वेगवेगळ्या शाखेसाठी नियुक्तीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत. ही चाचणी प्रवेश परीक्षा हवाई, तांत्रिक आणि स्थलसेवा कार्य या विभागातील उमेदवार निवडीकरिता होती. ही परीक्षा के.डी.के. अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रुप कॅप्टन ए.के. उपाध्याय यांच्या पर्यवेक्षणाखाली नुकतीच घेण्यात आली. या परीक्षेत मध्य भारतातून एकूण २६३५ महिला व पुरुष उमेदवार सहभागी झाले होते.
एअर व्हाईस मार्शल व्ही.एस. भारती वायएसएम व्हीएम, व्हीएसएम, सिनियर एअर अॅन्ड अॅडमिनस्टॉफ ऑफिसर (एसएएएसओ) मेंटेनन्स कमांड यांनी गेल्या बारा वर्षांपासून भारतीय वायुसेनेच्या परीक्षेसाठी के.डी.के. अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे होत असलेल्या सहकार्याबद्दल व यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे रोजगार व प्रशिक्षण विभागाचे अधिष्ठाता मधुर शुक्ला यांना भारतीय वायुसेनेचे स्मृतिचिन्ह प्रदान केले. भारतीय वायुसेनेच्या यशस्वी आयोजनासाठी के.डी.के. शिक्षण समूहाचे कोषाध्यक्ष यशराज मुळक, बीसीवायआरसीचे प्रशासकीय अधिकारी के.के. महाडिक, के.डी.के. अभियांत्रिकी माहविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.पी. सिंग, उपप्राचार्य ए.एम. बदर, राजश्री मुळक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डॉ. पी. देवनानी, उपप्राचार्या सुधा श्रीकांत, नागपूर पॉलिटेक्निकचे प्राचार्य व्ही.के. बाबर, उमरेड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.सी. वाघमारे, भाऊसाहेब मुळक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एच. पारीख यांचे सहकार्य लाभले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा