पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र चेंबर आणि वूमन सोसायटी यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘कुंभमेळा २०१५ : केअर नाशिक-ग्रीन कॉल’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
शहरातील सर्व शाळांनी या स्पर्धाना चांगला प्रतिसाद दिल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. निबंध स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात प्रथम-आदिती महाजन, आठवी ते दहावी गटात प्रथम-ऐश्वर्या बेरेलाद्दानी, द्वितीय-प्रतीक निरगुडे, तृतीय- नवीनकुमार भाम्ब्रे, उत्तेजनार्थ हृषीकेश झुटे. खुला गटात प्रथम- हेमलता झंवर. स्लोगन स्पर्धेच्या आठवी ते दहावी गटात प्रथम- अनाम खान, खुला गटात प्रथम- विभाकर कुलकर्णी ओझरकर, द्वितीय- गिरीश पाटील, कविता स्पर्धेच्या पाचवी ते सातवी गटात प्रथम-अविनाश भांडवाले. खुला गटात प्रथम मारुती सावंत, द्वितीय- अलका कुलकर्णी. चित्रकला व पोस्टर स्पर्धेच्या पाचवी ते सातवी गटात प्रथम-तेजस कुलकर्णी, द्वितीय- मनोज पाटील, तृतीय-आयुष्यमान नामदेव, नंदन पाटील, उत्तेजनार्थ-श्रेयस भदाणे, विनायक आमडेकर, सुनील पाटीकर, भार्गव राणे,   सुजल बुब,    शिवानी बिरानी. आठवी ते दहावी गटात प्रथम-    उज्ज्वल   सोळंकी, द्वितीय- योगेश गुरव, अर्चित देशपांडे, तृतीय- रोहित शर्मा, उत्तेजनार्थ केतकी बोरसे, अशोक सोनवणे यांचा समावेश आहे.
परीक्षक म्हणून मुंबईचे पर्यावरण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, साहित्यिक व वृत्त निवेदक अनंत भावे, प्रख्यात लेखिका व वृत्त निवेदिका ज्योती जोशी यांनी काम पाहिले. सर्व विजेत्यांना पारितोषिके आणि स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी २५७७७०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Story img Loader