पर्यावरण दिन उत्साहात साजरा
पर्यावरण संरक्षण ही सामाजिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे ही आपली सामाजिक बांधीलकी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ मोहन कुलकर्णी यांनी केले. नाशिक शहर भाजपच्या वतीने आयएमए सभागृहात आयोजित पर्यावरण जागृतीविषयक कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर भाजप शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी, उत्तर महाराष्ट्र भाजपचे सहसंघटनमंत्री राजेंद्र फडके, प्रदेश सचिव सीमा हिरे, उपमहापौर सतीश कुलकर्णी, सरचिटणीस सुरेश पाटील आदी उपस्थित होते. घन कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास या कचऱ्याचा काही भाग पुनप्र्रक्रियेसाठी वापरता येऊन उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोयीस्कर होईल, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.
पर्यावरण संरक्षणाच्या कायदे प्रणालीची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास पर्यावरण संरक्षण मोठय़ा प्रमाणावर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या वेळी नाशिक शहर भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांनी शहर प्रदूषणमुक्त करण्याचे आवाहन फडके यांनी केले. उपमहापौर कुलकर्णी यांनी पर्यावरण संरक्षणसारख्या उपक्रमांमध्ये आपण सहभागी होऊ असे आश्वासन दिले.
या वेळी दीपक मंडळाच्या वतीने सुरेश गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली कचरा व पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर पथनाटय़ सादर केले. सूत्रसंचालन सुनील केदार यांनी केले. आभार सुरेश पाटील यांनी मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा