‘कंपनीमध्ये उत्पादनाइतकेच कामगारांनासुद्धा महत्त्व देणे गरजेचे आहे, तर प्रत्येक कारखानदारांनी कंपनी म्हणजे आपले घर मानून कामगार हे आपले भाऊबंद असल्याची भूमिका ठेवण्याची गरज आहे,’ असे मत सीआयआयचे विभाग कौन्सिलचे कोल्हापूरचे अध्यक्ष व ‘गोशिमा’ चे माजी अध्यक्ष सचिन शिरगावकर यांनी व्यक्त केले.
ते कोल्हापूर येथे आयोजित ’एच-आर फोरम साऊथ महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे किलोस्कर ब्रदर्स लि.चे कापरेरेट एचआरएमसी (निवृत्त) दिनकरराव िनबाळकर होते. यशस्वी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (वायआयटी) च्या सहकार्याने कोल्हापूर येथे ‘एच -आर फोरम- साऊथ महाराष्ट्र’ ची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक कंपनीतील मनुष्यबळ व्यवस्थापन (एचआर) अधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक संघटना शिरोळ मॅन्यु. असो. (स्मॅक) चे अध्यक्ष डी. डी. पाटील, ‘गोशिमा’ चे अध्यक्ष अजित आजारी, मेनन अ‍ॅण्ड मेननचे संजय बुरसे, आयआयटीचे बुरसे व तुपे आदी व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होते. एचआर फोरमची कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोअर कमिटी स्थापन केली असून त्याचे अध्यक्ष सदानंद पोसे (एचआर-कोल्हापूर स्टील) यांची निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार सचिन शिरगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये मनुग्राफ इंडिया लि., मेनन पिस्टन, मेनन अ‍ॅण्ड मेनन, मंत्री मेटलिक्स, ट्रीओ, ग्नॅट फौंड्री, कोल्हापूर स्टील लि., एसबी रिशलेर्स, रॉकेट इंजिन, मयूरा स्टिल यासह अनेक मोठय़ा कंपनीचे एचआर मॅनेजर हजर होते. या सोहळ्यास वायआयटीचे विश्वेश कुलकर्णी, तुपे, वादीराज इनामदार व टीम यांनी सहकार्य केले. तर एचआर फोरमतर्फे कोल्हापूर स्टीलचे संदीप सावंत, महादेव घाटे, राकेश जाधव, मेनन अ‍ॅण्ड मेननचे राजेंद्र यरूडकर, साधना दुधगावकर यांनी विशेष मेहनत घेतली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा