महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २०१३-१४ या वर्षांसाठी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे गठण करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडून देण्याची तरतूद आहे. त्यानुसार विद्यापीठ विद्यार्थी परिषदेतून सातारा येथील एस. सी. मुथ र्आयगल वैद्यकीय महाविद्यालयातील श्रीराम रगड, अंबेजोगाई येथील एसआरटी रुरल वैद्यकीय महाविद्यालयाचा राहुल मुंडे, नेरूळ येथील सायली तुंगारे या तिघांची अधिसभेवर निवड झाली आहे. परिषदेवर अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक सचिव आणि दोन सहसचिव निवडून देण्याची तरतूद आहे. यानुसार मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील राहुल कोगुरवालची अध्यक्ष, जयसिंगपूरच्या डॉ. जे. जे. मदगूम होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिराज परदेशी आणि नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अभिषेक वारंग यांची उपाध्यक्ष तर, सचिवपदी धुळ्याच्या दंत महाविद्यालयाची श्वेता आवळे यांची निवड झाली. सहसचिवपदी पुण्याच्या एलएफएम होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाची प्रियंका कुंभार आणि अहमदनगरच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीची तेजश्री भोईर यांना निवडण्यात आले. कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ आदिनाथ सूर्यकर यांनी नवनिर्वाचित नावांची घोषणा केली. यावेळी मान्यवरांचे स्वागत विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. संदीप गुंडरे यांनी तर निवडणूक प्रक्रियेसाठी मार्गदर्शन सहाय्यक कुलसचिव मिलिंद देशमुख यांनी केले. कक्ष अधिकारी म्हणून हेमंत कर्डक यांनी काम पाहिले.

Story img Loader