मुंबईत असूनही विजेसारख्या प्राथमिक सुविधेपासून वंचित असलेल्या अंबुजवाडीत अखेर वीज आली. अंबुजवाडीमधील १३ रहिवाशांच्या घरांत वीज पोहोचवत ‘टाटा पॉवर’ने अंधारातील अंबुजवाडीतील वीजपुरवठय़ाचे काम सुरू केले आणि तेथील अंधारपर्व संपले.मुंबईच्या पश्चिमेकडील मालाड (पश्चिम) येथील मालवणीच्या जवळ अंबुजवाडीचा भाग आहे. या ठिकाणी प्रामुख्याने झोपडपट्टी आहे. पण मुंबईत असूनही या ठिकाणी वीजवितरण यंत्रणा नसल्याने लोकांच्या घरात वीज पोहोचली नव्हती. ‘टाटा पॉवर’ने या भागात उपकेंद्र स्थापन करत वीजयंत्रणा उभी केली. त्यानंतर स्थानिक खासदार संजय निरूपम यांच्या उपस्थितीत ‘टाटा पॉवर’च्या अधिकाऱ्यांनी अंबुजवाडी भागाला वीजपुरवठा सुरू केला. २५० रहिवाशांना वीज जोडणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर तीन हजार जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. आरंभी पाच हजार घरांना वीजपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अखेर अंबुजवाडीत वीज आली!
मुंबईत असूनही विजेसारख्या प्राथमिक सुविधेपासून वंचित असलेल्या अंबुजवाडीत अखेर वीज आली. अंबुजवाडीमधील १३ रहिवाशांच्या घरांत वीज पोहोचवत
First published on: 06-02-2014 at 01:23 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eventually ambujwadi gets power