मुंबईत असूनही विजेसारख्या प्राथमिक सुविधेपासून वंचित असलेल्या अंबुजवाडीत अखेर वीज आली. अंबुजवाडीमधील १३ रहिवाशांच्या घरांत वीज पोहोचवत ‘टाटा पॉवर’ने अंधारातील अंबुजवाडीतील वीजपुरवठय़ाचे काम सुरू केले आणि तेथील अंधारपर्व संपले.मुंबईच्या पश्चिमेकडील मालाड (पश्चिम) येथील मालवणीच्या जवळ अंबुजवाडीचा भाग आहे. या ठिकाणी प्रामुख्याने झोपडपट्टी आहे. पण मुंबईत असूनही या ठिकाणी वीजवितरण यंत्रणा नसल्याने लोकांच्या घरात वीज पोहोचली नव्हती. ‘टाटा पॉवर’ने या भागात उपकेंद्र स्थापन करत वीजयंत्रणा उभी केली. त्यानंतर स्थानिक खासदार संजय निरूपम यांच्या उपस्थितीत ‘टाटा पॉवर’च्या अधिकाऱ्यांनी अंबुजवाडी भागाला वीजपुरवठा सुरू केला. २५० रहिवाशांना वीज जोडणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर तीन हजार जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. आरंभी पाच हजार घरांना वीजपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा