नटनटीच्या मोहाच्या पलीकडे चित्रपटाचे विश्व आहे. चित्रपटाचा नेमकेपणाने आस्वाद घेता आला पाहिजे, त्याकरिता चित्रपटसाक्षर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शका सई परांजपे यांनी केले. येथे आजपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला. या निमित्त सई परांजपे यांना गोव्यातील प्रसिद्ध कवी विष्णू सूर्या वाघ यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी परांजपे बोलत होत्या. या कार्यक्रमास ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, देविदास बोरकर, दिलीप बापट, उदय कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा चित्रपट महोत्सव २७ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे. अनेक उत्कृष्ट चित्रपट पाहण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे.