गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपांचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील चौपन्नावा लेख.

 गावात तंटे निर्माण होण्याची जी काही कारणे आहेत, त्यातील एक प्रमुख कारण निवडणुकीतही दडलेले असते. गावात तंटे होऊ न देता राजकीय सामंजस्याद्वारे शांततेचे वातावरणात निर्माण करून विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत व पतपेढय़ांची निवडणूक प्रक्रिया अविरोध पार पाडणे आवश्यक ठरते. महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहिमेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील काही गावे निश्चितपणे त्या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसून येते.
गावपातळीवर वाद निर्माण होण्याची जी काही कारणे आहेत, त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे राजकीय मतभेद. कधीकधी छोटय़ा कारणांवरून सुरू झालेला राजकीय वाद पुढे मोठे स्वरूप धारण करतो. अनेकदा गटातटांतील राजकारणामुळे त्यास हिंसक वळणही लागते. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते. या वादाशी कोणताही संबंध नसलेला ग्रामस्थ हा घटक त्यात नाहक भरडला जातो. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी व पतपेढी यांच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहतात. प्रचारादरम्यान त्यांचे वादंग उडतात. त्याचा परिणाम शांततेवर होत असल्याने किमान गावपातळीवर या घटकांनी सामंजस्य राखून काम करावे, असा दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. गावात ज्यांच्या शब्दाला मान आहे अथवा ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो, त्यांना प्रामुख्याने तंटामुक्त गाव समितीमध्ये स्थान दिले जाते. त्यांच्यामार्फत गावातील राजकीय मतभेद व कटुता दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जावेत, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये गावात राजकीय सामंजस्य निर्माण करण्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
त्याअंतर्गत गावातील विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत, पतपेढी वा तत्सम निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न करणे आणि प्रयत्न करूनही निवडणूक अविरोध होऊ शकली नाही तर ती शांततेत पार पडावी, असे अभिप्रेत आहे, जेणेकरून राजकीय मतभेदापायी ग्रामस्थांमध्ये गटातटाच्या राजकारणाला थारा राहणार नाही आणि वादही आपसूक टाळले जातील.
तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांनी केलेल्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती अनेक ठिकाणी निवडणूक अविरोध पार पडण्यात झाली. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील काही गावांमध्ये या पद्धतीने अविरोध ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ शकली. ज्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्या बहुतांश गावांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या या प्रक्रियेत सदस्यांनी बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याचे पोलीस दलाने मान्य केले आहे.
    ल्ल अनिकेत साठे

local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Story img Loader