कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील माजी सैनिक किंवा त्यांच्या पत्नीला निवासी मालमत्ता करात शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
माजी सैनिक, जखमी सैनिक, शहीद सैनिकांचे आई, वडील, पत्नी यांना हयात असेपर्यंत या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. वाणिज्य, व्यापारी तत्त्वावरील मालमत्ता करात ही सवलत देण्यात येणार नाही. माजी सैनिकांना महापालिकेच्या मालमत्ता करात सवलत देण्याचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपूर्वी महासभेने मंजूर केला आहे. प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आयुक्त शंकर भिसे यांनी घेतला आहे.
आणखी वाचा