जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तलाठय़ांची २५ पदे सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार असून त्यासाठी २२ जूनला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. रिक्त पदांपैकी काही पदे माजी सैनिक, अंशकालीन कर्मचारी, महिला, प्रकल्पग्रस्त व खेळाडू उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
या पदासाठी १४ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येत असून जाहिरात व अर्जाचा नमुना नागपूरडॉटएनआयसीडॉटइन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. ऑनलाईनशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. संकेतस्थळावर असलेल्या अर्जात माहिती भरून सादर करावा व प्रिंटआऊट काढून घ्यावी. इंटरनेटवर उपलब्ध होणारा नोंदणी क्रमांक जपून ठेवावा. अर्ज सादर केलेल्या उमेदवारास कागदपत्रांच्या छाननीशिवाय परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवर्गनिहाय गुणानुक्रमे उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारास कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने संबंधित पदांच्या पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज सादर करावा. परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर इंटरनेटवर उपलब्ध होणारा नोंदणी क्रमांक जपून ठेवावा, अशी सूचना जिल्हा निवड समितीने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा