शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजेश सपकाळ यांच्या सांगण्यावरून तालुक्यात नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी फसव्या आहेत. चुकीच्या लोकांच्या निवडी करणारे संपर्कप्रमुख जुन्या शिवसैनिकांना विश्वासात घेत नाहीत. त्यांची हकालपट्टी करून आमदार अनिल राठोड यांची संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात यावी यासाठी लवकरच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे माजी उप जिल्हाप्रमुख सदा कराड यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत कराड बोलत होते. यावेळी यावेळी रविंद्र भोसले, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, ज्ञानेश्वर गुलदगड, अशोक पवार, प्रशांत भोसले, सुभाष लबडे, रवींद्र थोरात, अनंत डाके, बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र लबडे, विजय तिवारी, काका ठोसर, पप्पु ताके, पप्पु दौड, रामचंद्र पवार, अरूण भारसाकळ आदी उपस्थित होते.
कराड म्हणाले, सपकाळ हे पक्षाची फसवणूक करत आहेत. आम्ही पदाधिकारी असुनही त्यांनी आम्हाला कधी बैठकीस बोलावले नाही. ते गटबाजीला प्रोत्साहन देत आहेत. यासंदर्भात आम्ही कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. सपकाळ हे तक्रार करण्यासाठीसुद्धा भेटत नाहीत. दरम्यान तालुका सरचिटणिस सतिश बोर्डे व विद्यार्थी सेना शहरप्रमुख रितेश काटे यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, वाळूतस्करी करणारे आणि पक्षाशी नेहमी गद्दारी करणाऱ्या तसेच पक्षात कुठलेही योगदान नसणाऱ्या लोकांची श्रीरामपूर तालुक्यामध्ये निवड करणाऱ्या जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व संपर्कप्रमुख सपकाळ यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेचे बुथप्रमुख
येत्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पक्षाने ग्रामिण भागातील बुथप्रमुख व पोलिंग एजंटची यादी मागविलेली आहे. श्रीरामपूर तालुक्याची यादी सपकाळ यांना दिली गेली, त्यात इतर पक्षाच्या ताब्यात असलेल्या संस्थांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची नावे आहेत असा गौप्यस्फोट कराड यांनी केला. या यादीची प्रत पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केली. या यादीत कारखान्याचे संचालक, बाजार समितीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर संस्थांवरील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expeactations for droup out to contact person sapkal
Show comments