विधि शाखेतील बीएसएल आणि एलएलबी अभ्यासक्रमातील शेवटच्या वर्षांच्या ‘इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅटय़ुटरीझ’ विषयाच्या परीक्षेत नाशिक विभागातील तब्बल २०० तर पुणे व नगर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. या विषयाच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
हा विषय अतिशय सोपा असूनही या विषयात एवढय़ा प्रचंड प्रमाणात विद्यार्थी अनुत्तीर्ण होणे शक्य नसल्यामुळे या विषयाच्या निकालात घोळ असल्याचा संशय मनसेने केला आहे. उशिराने लागलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान व त्यांना झालेल्या मानसिक त्रासाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या विषयाचे मोफत पुनर्मूल्यांकनाचे आदेश देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा