झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात यापूर्वी वाढीव चटईक्षेत्रफळाच्या नावाखाली घोटाळा झाला असण्याची शक्यता असून त्यानुसार तक्रारी मिळाल्यानंतर जुनी प्रकरणे तपासण्यात येणार आहेत. कांदिवलीतील बंदरपाखाडी येथील झोपु योजनेत अशाच पद्धतीने घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर प्राधिकरणाने या योजनेला स्थगिती दिली होती.
१८ वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या झोपु योजनांचा आढावा विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मल देशमुख यांनी घेतला असून बंद पडललेल्या तसेच रखडलेल्या झोपु योजनांना पुन्हा चालना मिळावी, या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून सुमारे ४०० हून अधिक योजनांच्या प्रवर्तकांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. तसेच काही योजना सुरूच झाल्या नसल्याचे आढळून आल्यानंतर त्या गुंडाळण्यात येणार आहेत. या पाश्र्वभूमीवर काही झोपु योजनांमध्ये विकासकांनी झोपुवासीयांना २२५ चौरस फुटाचे घर देऊन २६९ चौरस फुटाच्या वाढीव चटईक्षेत्रफळाचा फायदा घेतल्याचेही देशमुख यांच्या लक्षात आले. त्यानुसार बंदरपाखाडीचे प्रकरण समोर येताच त्याबाबत स्थगिती दिली. आता अशा प्रकारच्या काही जुन्या प्रकरणांचाही आढावा घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
झोपुवासीयांना सुरूवातीला २२५ चौरस फूट घर मोफत दिले जात होते. ते चटईक्षेत्रफळ वाढवून २६९ चौरस फूट इतके करण्यात आले. काही विकासकांनी २२५ चौरस फुटाने पुनर्वसनाच्या इमारती बांधून दिल्या. परंतु चटईक्षेत्रफळाचा लाभ घेताना मात्र या वाढीव चटईक्षेत्रफळाचा लाभ घेतल्याचे उघड होऊ लागले. काही प्रकरणात विकासकांनी हा लाभ घेतला असण्याची शक्यता असल्यामुळे अशी प्रकरणे तपासण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
‘झोपु’त वाढीव चटई क्षेत्रफळाचा घोटाळा?
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात यापूर्वी वाढीव चटईक्षेत्रफळाच्या नावाखाली घोटाळा झाला असण्याची शक्यता असून त्यानुसार तक्रारी मिळाल्यानंतर जुनी प्रकरणे तपासण्यात येणार आहेत.
First published on: 15-02-2014 at 01:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extra fsi in zopu