महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागातर्फे महाशिवरात्रीनिमित्त २७ आणि २८ फेब्रुवारीला यात्रास्थळी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त कामठेश्वर येथे यात्रा भरते. या यात्रेसाठी महामंडळातर्फे २७ आणि २८ फेब्रुवारीला मोरभवन ते कामठेश्वर आणि गांधीबाग ते कामठेश्वर अशा बसेस सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अंभोरा येथील यात्रेसाठी नागपूर-अंभोरा, आयचित मंदिर ते अंभोरा, कुही ते अंभोरा, कुही रेल्वे स्थानक ते अंभोरा, उमरेड ते अंभोरा बसेस सोडण्यात येणार आहे. याबरोबरच चारगाव, तारणा, मन्नाथगड, ढगा, कोटेश्वर, गायमुख, घोग्रा येथेही महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. चारगाव यात्रेसाठी नागपूर, उमरेड, बेला आणि बुटीबोरी येथून २७ फेब्रुवारीला सकाळपासून बसेस सोडण्यात येणार आहे.
तारणा यात्रेसाठी उमरेडवरून बसेस सोडल्या जातील. मन्नाथगडसाठी काटोल येथून तर ढगासाठी काटोल-कोंढाळी मार्गे बसेस सोडण्यात येणार आहे. गायमुख यात्रेसाठी रामटेक-जाम मार्गे, घोग्रासाठी रामटेक व पारशिवनी येथून तसेच कोटेश्वर यात्रेसाठी रामटेक व नगरधन येथून बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या नागपूर विभागाच्या विभाग नियंत्रकांनी दिली आहे.

Story img Loader