येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नयनकुमार ऊर्फ बबलू वाणी यांना ते दुकानातून काम आटोपून घरी जात असताना वीज मंडळ कार्यालयासमोर मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केली. त्यात ते जबर जखमी झाले असून शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी जादा कुमक मागवून बंदोबस्त ठेवला आहे. वाणी यांना मारहाणीची बातमी पसरताच शहरात तणाव वाढला. पोलीस निरीक्षक मधुकर औटी यांनी सांगितले, की वाणी यांच्या छातीला व डोक्याला जबर मार लागला असून त्यांना सुरुवातीला डॉ. विजय क्षीरसागर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले व आता त्यांना शिर्डी येथील रुग्णालयात हलवले जाणार आहे.
मारहाणीची घटना समजताच पोलीस निरीक्षक मधुकर औटी, पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार, सहायक पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. तेथे एक मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली. राऊत व अन्य एकास याप्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा