गेल्या आठवडाभरात मेडिकल, मेयो आणि डागा या तीनही रुग्णालयात डोळ्यांना संसर्ग झालेले जवळपास ५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. नागपुरात अनेक भागात या रोगाने थैमान घातले असून खाजगी रुग्णालयात आणि शासकीय रुग्णालयातील बाह्य़रुग्ण असलेल्या विभागातही डोळ्यांचा संसर्ग झालेल्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. अनेक पावसाळी आजारांनीही उपराजधानीला विळखा घातला असून शहरात माजलेल्या अस्वच्छतेमुळे आजार वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागपुरात मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारच्या डोळ्यांच्या आजाराची लागण झाली असून अॅडिनोव्हायरस या विषाणूमुळे गंभीर आजाराचाही समावेश झाला आहे. हा संसर्गजन्य आजार असून एकाला झालेला आजार दुसऱ्याला होतो असे चित्र सध्या दिसत आहे. या आजाराने शासकीय रुग्णालयातील नेत्रविभागात ५०० रुग्ण आठवडाभरात डोळ्यांच्या उपचारासाठी आले असल्याची माहिती आहे. डोळ्यांचा आजार हा संसर्गजन्य असल्यामुळे आरोग्य विभागाला धास्ती बसली आहे.
डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, चिपड येणे, डोळ्यांना खाज सुटणे, सकाळी उठल्यावर डोळे उघडता येत नाही, पापण्यांवर सूज येणे, अंधूक दिसणे, अशी विविध प्रकारची लक्षणे डोळ्यांचा आजार झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात. शहरात पावसामुळे होणारा चिखल, अस्वच्छता, घाण, साचलेले दूषित पाणी यामुळे हा आजार वाढत जात असतो. अॅडिनोव्हायरस हे विषाणू अस्वच्छतेमुळे वाढल्याने हा आजार पसरत आहे. खोकला, स्पर्श अशा विविध कारणांनी हा आजार पसरत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात बोलेले जात असून महापालिका पावसाळ्यापूर्वी आणि नंतर योग्यप्रकारे शहरात स्च्छता, साफसफाई करत नसल्याचा आरोप नागरिक करत आहे. या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपाचा आरोग्य विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यावर काय उपाययोजना करणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
उपराजधानीत डोळ्यांची साथ; पावसाळी आजारही बळावले
गेल्या आठवडाभरात मेडिकल, मेयो आणि डागा या तीनही रुग्णालयात डोळ्यांना संसर्ग झालेले जवळपास ५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. नागपुरात अनेक भागात या रोगाने थैमान घातले असून खाजगी रुग्णालयात आणि शासकीय रुग्णालयातील बाह्य़रुग्ण असलेल्या विभागातही डोळ्यांचा संसर्ग झालेल्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-07-2013 at 02:55 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eye infection spreads very fast in nagpur