ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांमध्ये सवलती देणाऱ्या २००७ सालच्या कायद्याची अंमलबजावणी असो.. लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना विशेष सेवा उपलब्ध करण्याची बाब असो वा मुलांच्या परदेशी वास्तव्याने किंवा सोडून देण्याने वृद्धावस्थेत वाटय़ाला आलेल्या एकाकी जीवनाचा मुद्दा असो.. हे सगळे मुद्दे गेल्या आठवडय़ात उच्च न्यायालयात एकामागोमाग एक असे सुनावणीस आले आणि ज्येष्ठांची परवड, सरकारदरबारी त्यांच्याबाबत असलेली उदासीनता उघडकीस आली. परंतु आप्तेष्टांनी, सरकारने वाऱ्यावर टाकलेल्या या वृद्धांसाठी न्यायालयाने पुढाकार घेतला आणि त्यांना त्यांचा न्याय्य हक्क देणारे आदेश देत सगळ्यांनाच चपराक लगावली. एवढेच नव्हे, तर वृद्धांसाठीच्या कायद्याला, त्याद्वारे त्यांना देण्यात आलेल्या सवलतींना प्रसिद्धी देण्याचे न्यायालयाने बजावले. मात्र, त्याच वेळी वृद्धांना इतर ठिकाणीही पदोपदी अडीअडचणींना तोंड द्यावे लागत आहे. न्यायालयात काही प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली असली तरी पोलीस, शहरातील सोयीसुविधा या प्रश्नांचे काय, याचा हा आढावा..
कातरवेळ
‘द मेन्टेनन्स अॅण्ड वेल्फेअर ऑफ पेरेन्ट्स अॅण्ड सीनिअर सिटिझन्स अॅक्ट’ असे या कायद्याचे नाव असून २००७ मध्ये हा कायदा करण्यात आला. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच २०१० मध्ये राज्य सरकारने या कायद्याच्या अनुषंगाने अध्यादेश काढला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा