रांजणी येथील नॅचरल शुगर इंडस्ट्रीजला खोटा धनादेश दिल्याप्रकरणी एका ऊसतोड ठेकेदारास एक महिना साधी कैद व १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी संजय मुळीक यांनी दिला.
नॅचरल शुगर अलाइड इंडस्ट्रीजने २००५-०६ मध्ये चितेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला होता. येथे लागणारा उसाची तोड करून वाहतुकीसाठी ठेकेदार राजाभाऊ काळे (रा. खर्डी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) यांच्यासोबत लेखी करार केला होता.
या करारापोटी काळे यास उचल देण्यात आली होती. मात्र, कराराप्रमाणे काम न केल्याने काळे यांच्या खात्यावर ७३ हजार ६१० रुपये नॅचरल शुगरचे येणे बाकी होते. ती बाकी काळे यांच्याकडे मागणी केली असता त्याने कारखान्याला एक धनादेश दिला होता. तो वटला नाही.
कारखान्याने काळे यांच्याविरुद्ध न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मुळीक यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. काळे यास ३० दिवस कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी कारखान्याच्या वतीने अ‍ॅड. किरण जाधव यांनी काम पाहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा