मोटार ट्रेनिंग स्कूलच्या परवान्याचे नूतनीकरण झालेले नसतानाही सुमारे ३४ प्रशिक्षणार्थीच्या अर्जावर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या खोटय़ा सह्य़ा व शिक्के मारून बनावट कागदपत्रे कार्यालयात दाखल केल्याप्रकरणी ओमसाई मोटार ट्रेनिंग स्कूलचे चालक ज्ञानेश्वर बबन कदम यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
ओमसाई मोटार ट्रेनिंग स्कूलच्या परवान्याचे नूतनीकरण झालेले नाही. असे असतानाही स्कूलचे चालक ज्ञानेश्वर कदम यांनी सुमारे ३४ प्रशिक्षणार्थीच्या परवाना अर्जावर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या खोटय़ा सह्य़ा व शिक्के मारून बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच ही कागदपत्रे खरी आहेत, असे भासवून वागळे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केली. जानेवारी ते सप्टेंबर २०१२ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा