कर्जबाजारीपणास कंटाळून दुधाळा (तालुका औंढा नागनाथ) येथील शेतकरी चंद्रप्रकाश दाजिबा पवार (वय ६०) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी राहत्या घरी त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.
हैदराबाद बँक व जिल्हा बँकेकडून पवार यांनी कर्ज घेतले होते. दुधाळा तंटामुक्तीचे अध्यक्ष भास्कर पोळे, मृत शेतक ऱ्याचा मुलगा माधव चंद्रप्रकाश यांनी सांगितले, की बँकांकडून घेतलेले कर्ज फिटत नसल्याने कंटाळून पवार यांनी सकाळी राहत्या घरी विष घेतले. या प्रकारानंतर उपचारार्थ त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील अहवाल येताच गुन्हा नोंद केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader