शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा शेतकरी साहित्य पुरस्कार जामनेर (जिल्हा जळगाव) येथील अशोक कौतिक कोळी यांना जाहीर झाला. पुरस्काराचे हे १५ वे वर्ष असून पुरस्कार वितरण मंगळवारी (दि. २५) प्रसिद्ध नाटककार, विचारवंत प्रा. दत्त भगत यांच्या हस्ते, तसेच निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात होणार आहे.
अशोक कोळी यांचे ‘कूड’, ‘आसूड’ हे कथासंग्रह, ‘गावाकडच्या कविता’ हा कवितासंग्रह, ‘पाडा’, ‘कुंधा’ या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. यापूर्वी त्यांना राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार, भि. ग. रोहमारे पुरस्कार, अस्मितादर्श वाङ्मय पुरस्कार, मृत्युंजय शिवाजी सावंत पुरस्कार मिळाले आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना. गो. नांदापूरकर सभागृहात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता पुरस्कार वितरण होणार असून, कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. निळकंठ डाके यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा