पोळ्यानिमित्त बैलांना पाणी पाजण्यासाठी कृषीपंप सुरू करण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागल्याने तालुक्यातील आर्वी येथे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकरी वारकू जगदेव पवार वय ५० यांचा काल ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शेतात विजेचा धक्का लागून मृत्यू आला. मयत शेतकरी आज सकाळी शेतावर पोळ्याच्या निमित्ताने बैलांना पाणी पाजण्यासाठी व बैल धुण्यासाठी विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेला असता त्यास विजेचा धक्का लागून मृत्यू आला. मयत शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.
 परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मयत पवार यांच्या नातेवाईकांना अपघाती मृत्यूबद्दल भरपाई म्हणून दोन लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी आ. प्रा. शरद पाटील यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers death of electricity shock