पणन महासंघाने कापूस खरेदी बंद केली. बाजार समित्यांनीही वांदा समित्याचे दार बंद केले. परिणामी कापूस खरेदीत व्यापाऱ्यांची मनमानी सुरू झाली आहे. कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे इतर राज्यातील जििनग मालकांनी अत्यंत कमी भावात कापूस खरेदी सुरूकेल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कापसाला किमान पाच हजार रुपये प्रति िक्वटल भाव मिळावा यासाठी सहकार विभागाने प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवावी अन्यथा पणन राज्यमंत्री सुरेश धस यांची गाडी अडवू, असा इशारा गंगाभीषण थावरे यांनी दिला आहे.
 बीड जिल्ह्य़ात शेतकऱ्यांकडे पहिल्या वेचणीतील कापूस उपलब्ध झाला आहे. कापसाचे मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न झाल्यामुळे कापूस खरेदीसाठी इतर राज्यातील व्यापारी बीड जिल्ह्य़ात आले आहेत. शेतकऱ्यांना किमान भाव मिळावा असे शासनाचे धोरण असले, तरी पणन महासंघाने खरेदी बंद केल्यानंतर बाजार समित्यांनी वांदा समित्याही गुंडाळून ठेवल्या आहेत. सहकार विभागाचे अधिकारी आणि व्यापारी यांच्यात संगनमत असल्यामुळे अत्यंत कमी किमतीत व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केली आहे. अडलेला शेतकरी मिळेल त्या भावात कापूस देऊन मोकळा होत आहे. सुमारे चार हजार रुपयांपर्यंत कापसाची खरेदी सुरू आहे. पहिल्या वेचणीचा अत्यंत चांगल्या प्रतीचा कापूस कवडीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. व्यापारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने कापूस खरेदी होत आहे.
पणनमंत्री सुरेश धस यांनी अधिकाऱ्यांची बठक घेऊन तत्काळ कापसाच्या भावावरून शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवावी अन्यथा त्यांची गाडी अडवू, असा इशारा गंगाभीषण थावरे यांनी दिला आहे.

Story img Loader