तालुक्यातील जवळगाव-पिंप्री मार्गावरील शेतात जाणारा पांदण रस्ता तीन शेतकऱ्यांनी अडविल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झाले आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदामार्गावरूनरांकडे तक्रार केली असून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
जवळगाव-पिंप्री मार्गावरून शेतात जाण्यासाठी अनेक वर्षांंपासून पांदण रस्ता आहे. मात्र, काशिनाथ दाढे, संजय गुघाणे, अरुण गुघाणे यांनी तारेचे कुंपण टाकू न रस्ता बंद केला. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात जाण्याकरिता रस्ता राहिला नाही. दुसरा रस्ता उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रार तहसीलदारांकडे केली आहे.
या तक्रारीला पंधरा दिवसांचा कालावधी लोटूनही दखल घेण्यात आली नाही.
तलाठय़ांनी  रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी पंकज गावंडे, संजय ठवरे, उमाकांत चावरे, सूर्यभान आखरे, खुशाल चावरे, शंकर अवघड, गजानन झाडे, पुंडलिक झाडे, बाबाराव गुघाणे, प्रशांत गुघाणे, सुधाकर दाढे, भास्कर हेडाऊ आदींनी केली आहे.

Story img Loader