शेतकरी-शेतमजुरांना पेन्शन कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या जिल्हा शाखेतर्फे हौसलाल रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार हंसा मोहने यांना देण्यात आले.
दरम्यान, तहसील कार्यालयात हौसलाल रहांगडाले, मििलद गणवीर, प्रल्हाद उके, शेखर कनोजिया, बाबुराव राऊत, शंकर िबझलेकर यांनी शेतकरी व शेतमजुरांना मार्गदर्शन केले. या निवेदनात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, ६० वर्षांवरील सर्व शेतकरी-शेतमजूर कामगारांना तीन हजार मासिक पेन्शन देण्यात यावी, भूमिहीन शेतकरी, शेतमजूर, आदिवासींना वनहक्क जमिनीच्या पट्टय़ांचे वाटप करण्यात यावे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, सर्वाना स्वस्त धान्य दुकानातून ३५ किलो धान्य दोन रुपये प्रती किलोप्रमाणे वाटप करण्यात यावे, घरकुलाकरिता ३ लाख रुपये मंजूर करण्यात यावे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हेमी योजनेंतर्गत २०० दिवस कामाची हमी व प्रती दिन २५० रुपये मजुरी देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.

Story img Loader