कर्जत तालुक्यातील सीना धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित केल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी दिली.
सीना धरणात सध्या ७१० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. उजवा कालवा तालुक्यातील निमगाव गांगर्डापासून दिघी असा ४८ किमी लांब आहे. या कालव्याच्या परिसरात नेमके पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच धरणातून आवर्तनाची गरज आहे. धरणात एक आवर्तन होईल एवढे पाणी आहे. ते सोडावे यासाठी मागील आठवडय़ात मिरजगाव येथे आमदार राम शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर कृष्णा खोरे मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. त्यांनी आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिले, मात्र पाणी सोडले जात नाही म्हणून भाजपने आज रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, आवर्तन सोडल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. आता टेल टू हेड पाणी देण्यात येणार आहे अशी मागणी खेडकर यांनी केली आहे.
 

Story img Loader