पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी येथील नवजीवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.
पाणी प्रश्नाच्या मुळाशी जाऊन ही समस्या कायमस्वरुपी सोडविण्यात यावी असे मत देशमुख यांनी मांडले आहे. शेततळे, दुष्काळी कामे, नाले बांधणे यासारख्या कामांवर शासन मोठय़ा प्रमाणात खर्च करीत असून त्याचा योग्य तो परिणाम होताना मात्र दिसत नसल्याचे लक्षात येते.
पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी फाऊंडेशनने संपूर्ण जिल्ह्यातील पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी करून ते पुनज्र्जीवित करण्याची मागणी केली आहे. पुढील काळात पाण्यावरून अधिक प्रमाणात वाद होण्याची शक्यता वर्तविली आहे. चेन्नई शहराप्रमाणेच रेन हार्वेस्टिंग उपक्रमाची आपल्याकडे सक्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्यातील नदी, नाले, ओढे, शिरपूर पॅटर्नप्रमाणे खोल व रुंद करावीत, त्याव्दारे पाण्याची पातळी वाढू शकेल. पावसाचा प्रत्येक थेंब अडविलाच गेला पाहिजे. पाणी प्रश्नाबाबत खास समितीची स्थापना करावी आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा