अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
पाच वर्षांच्या मुलीवर वेळोवेळी अमानुषपणे बलात्कार करतानाच तिचा अमानवीय पध्दतीने शारीरिक छळ करणारा सावत्र बापासह आईची न्यायालयाने २३ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
अल्पवयीन मुलीच्या शारीरिक शोषणाची माहिती समजल्यानंतर शेजारील महिलेने तक्रार दिली होती. या प्रकरणी पीडित मुलीचे सावत्र वडील सागर राठी आणि आई आशा पाटील यांच्या विरुद्ध लैंगीक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यानच्या काळात फरार झालेल्या दोघा संशयितांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. शहरातील गंगापूर रस्त्यावरील श्रीरंगनगरमधील गोकुळवाडीत हा प्रकार घडला. एका इमारतीत रखवालदार म्हणून ते कार्यरत होते. पीडित मुलीची आई आणि सावत्र बापाकडून सातत्याने अल्पवयीन मुलीचा छळ केला जात होता. ही बाब आसपासच्या महिलांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या मुलीला आपल्या घरी ठेऊन घेतले. परंतु, आशा पाटील व राठी यांना बाळ झाल्यावर त्याला सांभाळण्यासाठी ते मुलीला परत घेऊन गेले. त्यानंतर तिचा अतिशय क्रुरपणे छळ सुरू झाला. पीडित मुलीच्या आईने सावत्र बापाला मुलीच्या लैिगक शोषणास मदत केली. संशयित सागर राठी हा मुलीचे हात व पाय भ्रमणध्वनी ‘चार्जर’च्या वायरने बांधून ठेवत असे. अतिशय अमानवीपणे मुलीचा लैिगक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सावत्र बापाने मुलीवर वेळोवेळी अत्याचार केले. त्याबद्दल आईला माहिती असूनही तिने ही बाब जाणीवपूर्वक लपवून ठेवली. या मुलीची बिकट अवस्था पाहून शेजारील महिलेने चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. अटक केलेल्या दोघा संशयितांना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सावत्र बाप सागर राठी व आई आशा पाटील यांना २३ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा