सोलापूर जिल्ह्य़ात मृग नक्षत्राच्या पावसाने कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली असून सोमवारी शहर व परिसरात सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभरात अधूनमधून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे मोठय़ा पावसाची अपेक्षा होती. परंतु वरूणराजाने निराशा केली.
दरम्यान, सोमवारी वातावरणात गारवा जाणवत असताना तापमान ३२.७ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते. त्यामुळे उन्हाळा सरल्याची चाहूल लागली. दिवसभर आकाशात ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे मोठा व समाधानकारक पाऊस बरसण्याची चिन्हे निर्माण झाली होती. त्याप्रमाणे पाऊस पडावा म्हणून सर्वाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र सायंकाळी काही मिनिटे पावसाचे थेंब पडले. हलका पाऊस झाल्याने अनेकांनी या पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटला. अक्कलकोट येथे २ मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात उर्वरित भागात पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
सोलापुरात ढगांची गर्दी; तरीही वरुणराजाकडून निराशाच
सोमवारी शहर व परिसरात सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभरात अधूनमधून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे मोठय़ा पावसाची अपेक्षा होती. परंतु वरूणराजाने निराशा केली.
First published on: 11-06-2013 at 01:43 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feint of rain to solapur