समाजातील प्रत्येक विद्वान व्यक्तीला जन्म देणारी स्त्रीच आहे. तरीही समाज मुलींचा जन्म का नाकारत आहे? समाजात महिलांविरुद्ध पसरत चाललेल्या विकृत मानसिकतेमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना जाणवू लागली आहे. कुटुंब व्यवस्थेत मुलीऐवजी मुलांची मागणी वाढल्याने स्त्री-भ्रूणहत्येची कीड समाजाला लागलेली आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां रूपाली टेंभुर्णे यांनी व्यक्त केले.
कोसमतोंडी येथील संत बांगळुबाबा आदिवासी शैक्षणिक सुधारणा मंडळ मालुटोलाद्वारा संचालित फुलीचंद भगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
टेंभुर्णे म्हणाल्या, घटनेने स्त्री-पुरुषांना समानता हक्क दिला आहे. यासाठी स्वत:चे हक्क समजून त्यासाठी मुलींनी लढा द्या तेव्हाच स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल व समाजाला लागलेली कीड नष्ट होईल, अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोसमतोंडी येथील पोलीस पाटील लता काळसप्रे, प्रमुख अतिथी म्हणून सडक-अर्जुनीचे दामोदर नेवारे, जिल्हा क्रीडा प्रशिक्षक भोजराज चौधरी, से.स.सं .धानोरीचे अध्यक्ष मनोहर पाटील काशिवार, प्रभाकर मुंगमोडे, धानोरीच्या योगेश्वर पटले, मुंडीपारचे उपसरपंच फलेंद्र रहांगडाले, मुख्याध्यापिका अभिलाषा रहांगडाले, प्राचार्य बी.बी. येळे, विषयतज्ज्ञ अनिल वैद्य उपस्थित होते.
याप्रसंगी उपसभापती दामोदर नेवारे म्हणाले की, सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या अनेक सुप्तगुणाला चालना मिळते. दुसऱ्या दिवशी स्नेहसंमेलन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवकुमार काशिवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोसमतोंडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पी.आय. वैद्य, केवळराम पाटील काशिवार, विकास कावळे, प्रभाकर निर्वाण, डॉ. कमलाकर काशिवार, गजानन पाटील काशिवार, पंढरी काळसप्रे उपस्थित होते. संचालन सांस्कृतिक प्रमुख प्रा. नंदा हिवसे यांनी, तर आभार टी.आर. झोडे यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा