स्त्रीभूणहत्या हे स्त्रीशक्तीला लागलेले ग्रहण आहे. आंदोलनाने ते संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आजच्या आईने उद्याच्या आईला जन्माला घालण्याचा ठाम निर्धार करणे हाच त्यावर रामबाण उपाय आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले.
शिरूरकासार येथे अलंकापुरी शिवरात्रोत्सवचा कार्यक्रम सपकाळ यांच्या उपस्थितीत रविवारी झाला. मठाधिपती विवेकानंद शास्त्री यांची या वेळी उपस्थिती होती. सपकाळ म्हणाल्या की, आजच्या आईने उद्याच्या आईला जन्माला घातले, तरच देशाची संस्कृती टिकेल. भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. खऱ्या अर्थाने विश्वाची निर्मितीच स्त्रीच्या हातात आहे. त्यामुळे तिने भीती बाळगू नये. आई घरातले मांगल्य राखते व बाप दाराचे. मानवी जीवनाची नाव लीलया पार करण्यासाठी स्त्री व पुरुष या दोघांची गरज आहे. कार्यक्रमास युवक, युवती, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader