गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून फिरणारा बिबटय़ा वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास अडकला. ही बिबटय़ाची मादी असून तिचे वय अडीच वर्षांचे आहे. या बिबटय़ाला अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. परिसरातील जनतेने बिबटय़ा फिरत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी केली होती. जामगाव परिसरात बिबटय़ाला पकडण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. झोपडीवजा पिंजऱ्यात शेळी ठेवून तो येतो की नाही याची निगराणी केली जात असे. वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरा ठेवल्यानंतर गुरुवारी रात्री तो अडकला.

Story img Loader